🕒 1 min read
मुंबई : संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार हे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कारभार हातात घेणार आहेत. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.
शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक, त्याच विचारांवर राज्याची वाटचाल – अजित पवार
दरम्यान सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता १ जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र के जिस मुख्य सचिव से कॉंग्रेस के सारे मंत्री त्रस्त बताए जाते हैं, उसके रिटायरमेंट (30 जून) के बाद भी उसे मुख्यमंत्री कार्यालय में एडवाइज़री रोल में बैठाने का निर्णय कॉंग्रेस को चिढ़ाने वाला निर्णय है।
या #शिवसेना को कॉंग्रेस की कोई परवाह नहीं है ?
ये कैसा गठबंधन है?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 25, 2020
इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल
याच मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या मुख्य सचिवामुळे काँग्रेसचे सर्वच मंत्री नाराज होते, त्यांची निवृत्तीनंतर मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागर म्हणून करण्यात आलेली नेमणूक हा निर्णय काँग्रेसला चिडवण्यासारखा आहे. शिवसेनेला काँग्रेसची पर्वा नाही, ही कसली आघाडी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
