Share

गृहखाते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मस्ती आली आहे, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

रत्नागिरी : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

मोठी बातमी : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक, त्याच विचारांवर राज्याची वाटचाल – अजित पवार

याबाबत बोलताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गृहखाते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मस्ती आली आहे. या साऱ्या प्रकरणात आमच्या नेत्याच्या अंगावर येण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पण, त्यांनी एक बाब लक्षात ठेवावी आमच्या अंगावर आल्यास आम्ही देखील अंगावर जाऊ. गोपीचंद पडाळकर काय बोलले याच्या खोलात मला जायचे नाही. आमच्या नेत्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. पण, आम्हाला धमकी देऊ नये असा इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!