🕒 1 min read
नवी दिल्ली: सद्या महागाईमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार देशात होताच, या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अचानकपणे टाळेबंदी करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. त्यामुळे सामन्यांना आपला रोजगार गमवावा लागला. मात्र या परिस्थितीत देखील सामान्यांना इंधन दरवाढीला समोर जाव लागत आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीत वाढ झाली आहे.
या इंधन दरवाढी वरून कॉंग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सरकार वर निशाणा साधाला आहे. यावेळी त्यांनी ट्वीट करत जणू चारोळी लिहित सरकारवर टीका केली आहे. गेल्या ७३ वर्षातील हि सर्वोच्च इंधन दरवाढ आहे असे म्हणत त्यांनी, ‘सामन्यांच बजेट कोलमडल, शेतकरी आणि कामगारांवरील ओझ वाढल, खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्या, हेच आहेत का मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर जनतेला लुटन बंद करा, पेट्रोल-डीझेलच्या किंमती कमी करा असा त्यांनी म्हटल आहे.
73 साल में पेट्रोल-डीज़ल सबसे उच्चतम स्तर पर!
आम जनता का बजट बिगड़ा,
किसान-मज़दूर पर बोझ बढ़ा,
खाने पीने की चीजें होंगी और महँगी,
क्या यही हैं मोदी सरकार के “अच्छे दिन”?मोदी जी,
देशवासियों की जेब लूटना बंद करें,
पेट्रोल-डीज़ल की क़ीमत कम करें।#petroldieselpricehike pic.twitter.com/PCdofmsaTN— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 7, 2021
इंडियन ऑईलच्या सांगण्यानुसार, पुन्हा वाढत्या इंधन भाव वाढीच ओझ ग्राहकांवर येताना दिसत आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी सलग दुसर्या दिवशी भाव वाढवले आहे. आज दिल्लीत पेट्रोल 23 पैशांनी वाढून 84.20 रुपये प्रति लीटर झाले. तर डिझेल 26 पैशांनी वाढून 74.38 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल 90 .86 तर डिझेल 81 .०7 रुपये इतके आहे,
महत्वाच्या बातम्या
- आगामी पाच महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी भाजपचे हुकमी मोहरे मैदानात!
- एकटा जीव सदाशिव.. मोठ्या शहरांमध्ये विवाहितांपेक्षा अविवाहित नागरिक अधिक आनंदी !
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘कोरोना कॉलर ट्यून’ विरोधात याचिका दाखल
खासदार रवी किशन हे संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

