🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत.
दरम्यान,या सर्जिकल स्ट्राईकमुळे वायुदlलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय हवाईदलाच्या जिगरबाज जवानांनी सीमेपार घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या जवानांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या Air Strike नंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानच्या संसदेत त्याचे पडसाद पाहायला मिळाले.‘भारताने आपली इज्जत लुटली, त्यांना आपण उत्तर दिलेच पाहिजे’, अशी भाषा इमरान सरकारविरोधी खासदारांनी केली आहे.
असे बोटचेपे धोरण हे चालणार नाही. असं सांगतानाच त्यांनी पुन्हा कश्मीरप्रश्नावर जोर दिला. कश्मीरसाठी आपण एक झाले पाहिजे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जे जवान बलिदानीसाठी सज्ज असतात त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तसेच कागदी निंदा, निषेध व्यक्त करण्यापेक्षा हिंदुस्थानला प्रत्यक्ष उत्तर द्या, अशी मागणी केली जात आहे.
पाकिस्तानी नागरिक सोशल मिडीयावर देखील इमरान सरकारविरोधात पोस्ट करू लागले आहेत. संताप व्यक्त करणारे नेटकरी शर्म करो,शर्म करो असं म्हणत आहेत. इमरान खान यांना देखील आता ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
