मुंबई : राज्यातील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांना कोरोना विषाणूने चांगलाच विळखा घातला आहे. तसेच दुसरीकडे मात्र कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे.
याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी खा. सुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत या देवस्थान संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या कठीण काळात त्यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशा प्रसंगी त्यांचे आभार मानणे, ते करत असलेल्या कामाबद्दल जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्याही काही अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
दरम्यान, ‘सध्याच्या कठीण परिस्थितीत माणसांप्रमाणेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबाबत पुरेशी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती यावेळी काही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

