पुणे : कोरोना विषाणूचे संक्रमणाला रोखण्यासाठी केंद्रसरकारने देशभरात जनता कर्फ्यू चे आवाहन केले आहे. गर्दी कमी व्हावी या हेतून केंद्र सरकार आणि देशातील राज्यसरकारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. त्या दृष्टीने आता सार्वजनिक ठिकाणी संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो त्यामुळे या ठिकाणावरील गर्दी कमी व्हावी यासाठी आता राज्य सरकारने बसमधील गर्दी कमी करण्याबरोबरच आता लोकल सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ मार्च) सगळीकडं जनता कर्फ्यूची हाक दिली होती. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना करोनाचं संकट आक्राळविक्राळ होत चाललं आहे. झपाट्यानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. या कर्फ्यूच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक खास फोटो राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब घरी बसून काय करतंय याची माहिती सोशल मीडियातून नागरिकांना दिली आहे. त्याचबरोबर लोकांनी घरी बसून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालावा, असं आवाहनही केलं आहे. राजकीय नेत्यांनी करोनानं भारतात शिरकाव केल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं बंद केलं आहे. शरद पवार यांनीही सुरुवातीच्या काळात अनेक दौरे रद्द केले होते. त्यात आज सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेला फोटो अत्यंत प्रेरणादायी आहे.
करोनामुळे महाराष्ट्रात अनेकांना संसर्ग झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं अनेकांना लागणं झाली असून, राजकीय नेतेमंडळी, नेत्यांकडूनही लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. लोकांनी शक्य होईल तितका सामाजिक जीवनातील वावर कमी करावा, असं नेत्यांकडून सांगितलं जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M


