Share

शरद पवारांच्या ‘त्या’ सभेचा खरा श्रेयदार कोण ? सुप्रिया सुळेंनी केला मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : २०१९ची महाराष्ट्रातील निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. मग १०५ आमदार निवडणून येऊन देखील भाजपला विरोधात बसाव लागणं असो, किंवा पहाटेचा शपथ विधी असो. मात्र या ऐतिहासिक घडामोडीची खरी सुरवात झाली होती ती १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यामधून. राष्ट्रवादीला एकामागून एक नेते रामराम ठोकत होते. भाजपने तर समोर लढायला ‘पैलवान’ नाहीच अशा अविर्भावात लढायला सुरवात केली होती. पण खरा ‘पिच्चर’ तर अजून बाकी होता.

मग २०१९च्या या आखाड्यात अंगाला तेल लाऊन उतरला ८० वर्षाचा चिरतरुण योद्धा. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा साताऱ्यात झाली. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षांचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरघोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते.

ही सभा ज्या व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरात गेली त्या व्यक्तीबाबत आज राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. ‘शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. त्या ठिकाणी माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, रद्द होईल असा विचार करुन सर्व पत्रकार निघून गेले होते. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडिया सेलचा माणूस तेथे होता.’ असं त्या म्हणाल्या.

‘त्याने शशिकांत शिंदे यांना फोन करून विचारलं सभा होणार की नाही ? उरावर शशिकांत शिंदेनी हो सभा होणार आहे असं सांगितलं. पुढे तो म्हणाला, माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात माझा कॅमेरा खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल. शशिकांत शिंदेंनी कॅमेरा भरुन देण्याचं आश्वासन देत शुटिंग करायला सांगितलं. तो कॅमेरामन दीड लाख रुपयांचा कॅमेरा पावसात घेऊन काळजीने बसला आणि या देशातला टर्निंग पॉईंटचा सर्वात मोठा फोटो त्या कॅमेरावाल्याला मिळाला. नियतीच्या मनात काय असतं ते कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढला तर त्याचा परिणाम चांगला होता,’ असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!