Share

एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? सुप्रिया सुळेंची तुफान टोलेबाजी

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : २०१४ मध्ये भाजपने केंद्रासह महाराष्ट्रात देखील सत्तास्थापन केली होती. यानंतर, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाली होती. मात्र, २०१९ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याचं भाष्य केलं होतं. त्यांची पद्धत महाराष्ट्राने नाकारली आहे त्यामुळे त्यांनी आता रिटायर्ड व्हावं, असं देखील एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते. यानंतर, फडणवीसांनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.”असं भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!