Share

निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा कायम,सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली 16 डिसेंबर 2012 रोजी देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने दोषींच्या पुनर्विचार याचिका फेटाळून तिघांना ही माफी देण्यास नकार दिला आहे. चार मे रोजी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांची शिक्षा शिथील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यांना आता राष्ट्रपतींकडे द्या याचिका करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकिल एमएल शर्मा यांनी 15 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत 5 मे 2017 रोजी फाशीवर स्थगिती आणली होती. सहा आरोपींपैकी एक राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर सहावा आरोपी अल्पवयीने असल्याने त्याला तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाणही केली होती. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला.

त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने शिक्षा देखील बुधवारीच सुनावली

अश्लीलता आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते : हायकोर्ट

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!