नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात महिन्यात होणाऱ्या जेईई आणि नीटच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे.भारतीय वृत्त संस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अभियांत्रिकी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकलण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात नकार दिला आहे. त्यामुळे आता ह्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात महिन्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: शरद पवारांच्या ताफ्यातील दोघांना कोरोनाची लागण
सामना अग्रलेख: तर देशांतर्गत असलेल्या ‘या’ संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

