Share

‘सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळेच सुनील केदार यांची भाषा बिघडली’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Published On: 

मुंबई : ‘काँग्रेसचा कितीही मोठा नेता असेल आणि तो पक्षासी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून खाली उतरवून लाथा घाला’ असे वक्तव्य काँग्रेसचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर येथे आढावा बैठकीत केले होते. त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संगतीमुळे केदार यांची भाषा बिघडली अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले होते, ‘निवडणुकीत काँग्रेसचा कितीही मोठा नेता बेईमानी करत असला तर त्याला तिथंच गाडीतून उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं मी पाहून घेईन,’ असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष हा आपण सर्वांनी मेहनतीने उभा केला आहे, कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे, त्यामुळे वाटेल तसं करणार, हे चालणार नाही. असे काही अढळून आल्यास कार्यकर्त्यांनी मला फोन करावा असेही ते म्हणाले.

सुनील केदार यांच्या वक्तव्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, सुनील केदार हे माझे मित्र आहेत. त्यांची भाषा संगतीमुळे बिघडली आहे. असंगाशी संग केला तर अशा पद्धतीची भाषा येते. उद्या ते भाजपाशी संग करतील तेव्हा त्यांची भाषा बदलेल. चांगल्या संगतीत राहतील तर चांगली भाषा करतील. असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!