Share

सुजय विखेंना महापालिकेतील ‘नॉलेज’ नाही, भाजप नेत्याचा घरचा आहेर

Published On: 

अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. तसेच त्यांचा यापूर्वीचा राजकीय कार्यकाळ राहाता, शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेला. त्यामुळे त्यांना नगरच्या महापालिकेतील ‘नॉलेज’ नाही, अशी खिल्ली भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे महापालिकेतील नगरसेवक महेंद्र गंधे यांनी उडविली. त्यामुळे नगर भाजपमध्ये पुन्हा विखे विरुद्ध इतर असा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र आहे.

माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही – नितीन गडकरी

भाजपतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत पत्रकार परिषद बोलाविली होती. त्या पत्रकार परिषदेत गंधे यांनी थेट खासदारांवरच केलेली टीका चर्चेचा विषय ठरली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, पल्लवी जाधव, लता शेळके, अजय चितळे, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, सतीश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. गंधे यांच्या टीकेमुळे पक्षाचे नगरसेवक खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर थेट नाराज असल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही – सुधीर मुनगंटीवार

आपण गंभीर स्टेटमेंट दिले गेल्याचे लक्षात आल्याने गंधे यांनी पुन्हा सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. डॉ. विखे पाटील व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक घेण्यात आली. त्यांना महापालिकेतील समस्यांविषयी माहितीही देण्यात आलेली आहे. त्यानंतरच खासदारांनी महापालिकेतील समस्यांवर एक दीर्घ बैठकही घेतली असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न गंधे यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!