Share

समृद्धीच्या बछड्यांसाठी नावे सूचवा, मनपाचे नागरिकांना आवाहन

Published On: 

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाचही मादी बछड्यांचे नामकरण करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. याकरिता प्रशासनाने शहरवासियांना या बछड्यांसाठी नावे सुचवण्याचे आवाहन कले आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालयात बछड्यांसाठीची नावे आपल्या मोबाइल क्रमांक व पत्त्यासह पाठवावीत, असे आवाहन केले आहे.

पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात समृध्दी वाघिणीने २५ डिसेंबर २०२० रोजी पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या या बछड्यांसह वाघिणीची तब्येत चांगली आहे. जानेवारी महिन्यात या बछड्यांचे पंधरा दिवसानंतर डोळे उघडले. तेव्हा पशुवैद्यकीय डॉक्टरांनी या बछड्यांची तपासणी केली. त्यातून पाचही बछडे मादी अर्थातच वाघिणी असल्याचे निष्पन्न झाले.

या पाचही मादींचे नामकरण करण्याची तयारी आता पालिकेने सुरू केली आहे. यापूर्वी समृद्धीच्या चार बछड्यांच्या नामकरणासाठी शहरभरातील नागरिकांना नावे सूचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरवासीयांनी सूचविलेल्या नावांच्या चिठ्ठ्या काढून त्या चार बछड्यांचे नावे कुश, अर्पिता, देविका, प्रगती असे नामकरण करण्यात आले. आता समृद्धीच्या पाच बछड्यांचा नामकरण सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकातून या पाच वाघिणींची नावे ठेवण्यासाठी शहरवासियांना नावे सूचवण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!