टीम महाराष्ट्र देशा : कारखान्याचा गळीत हंगाम 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गाळपास आलेल्या व येणार्या उसास एकरकमी प्रति टन रु.2525 उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. कारखान्याचा शनिवारी अखेर 90955 मे.टन गळीत झाले आहे. कारखान्याने शेतकरी हिताचा निर्णय घेत सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम 27 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. प्रति रु.2200/- प्रमाणे दि.10 डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाचे बिल शेतक-यांच्या खातेवर जमा केले आहे.
20 डिसेंबर रोजीच्या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये उच्चांकी रु.2525 दर देण्याचा निर्णय झाल्याचे कार्यकारी संचालक मनिष देशमुख यांनी जाहीर केला. 30 नोव्हेंबर पर्यंत ऊस बिलाची फरक रक्कम प्रति टन 325 रुपयांप्रमाणे शेतक-यांच्या खातेवर जमा केली आहे. कार्यकारी संचालक मनिष देशमुख यांचे हस्ते शेतक-यांना रु. 325 फरक बिलाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक मनिष देशमुख व संचालक पराग पाटील यांचा जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर दिल्यामुळे सत्कार केला.
यावेळी संचालक पराग पाटील, प्रेसिडेंट टेक्निकल मोहन पिसे, मुख्य शेती अधिकारी राजाभाऊ खटके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र सारवडे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुनील बिराजदार, ऊस उत्पादक शेतकरी अमोगसिध्द आण्णाराव अजावडरे, धरेप्पा रंगनाथ बळक्षेत्री, तुकाराम पिराप्पा भरले, संगाप्पा बसाण्णा तेली तसेच विजयकुमार शहा, भालचंद्र नवले, मुत्याप्पा बबलेश्वर, भिमाशंकर बबलेश्वर, श्रीशैल पाटील, शिवशंकर रामपुरे, सिध्दाराम मेडीदार, सिध्दाराम तावसे उपस्थित होते.
कारखान्याकडून शेतकरी हिताचे निर्णयः देशमुख
शेतकरी, वाहन मालक व कामगार यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कारखाना प्रयत्नशील राहील. दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी कारखानदारी अडचणीत आली असताना सुध्दा शेतकर्यांना जास्तीत-जास्त ऊस दर देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. यापुढेही कारखाना सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे कार्यकारी संचालक मनिष देशमुख यांनी सांगितले.


