पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुधीर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांनाही २१जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी वकिलांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सात दिवसांची दिली.
दरम्यान, कोरगाव भीमा शौर्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनावर पुणे पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला होता.ही परिषद आयोजित करण्यासाठी माओवाद्यांच्या पैसा लागल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. तर रोना विल्सन यांच्याकडून मिळालेल्या पत्रामध्ये भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसच्या नावाचा उल्लेख असल्याने तेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पुणे पोलिसांनी मुंबई , दिल्ली आणि नागपूर येथून अनेकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली . तर सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग, माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

