मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सामान्य नागरिक ते अनेक नेते, खेळाडू तसेच सेलेब्रेटी देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत.यातच सोलापूरातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,पुण्यातील एका रुग्णालयात सुधाकर परिचारक यांच्यावर उपचार सुरु आहेत. ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे. सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या प्रार्थनेची गरज असल्याचं त्यांचा नातू प्रितीश परिचारक यांनी आवाहन केले आहे.
प्रितीश परिचारक यांची फेसबुकपोस्ट नेमकी काय आहे?
नमस्कार,गेल्या काही दिवसांपासुन पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणू ची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगिकरण वॉर्डस मध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.
आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोना ची लढाई कठीण होत आहे. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्ती वर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.धन्यवाद.
महत्वाच्या बातम्या –
राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती
लवकर बरे व्हा, रोहित पवारांच्या निलेश राणेंना सदिच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

