टीम महाराष्ट्र देशा : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जीवनप्रवासावरील ‘लोकयात्री सुभाष देशमुख’ या पुस्तकाच औपचारिक प्रकाशन पार पडले. या प्रकाशनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हे पुस्तक सुरेखाताई शहा यांनी लिहिले आहे.
या पुस्तकाविषयी ‘सामान्य कुटुंबातील शिक्षकाचा मुलगा, डोळ्याला इजा झाल्याने शाळा सोडण्याची नामुष्की, आई-वडिलांवर ओझं न होता स्वतःची उपजीविका स्वतः भागविण्यासाठी लहान-मोठ्या कामातून मोलमजुरी. अशी वाटचाल करत असताना, पोल्ट्रीफार्मवर काम करणारे माझे हात जनसेवेत अर्पण करण्याकामी बऱ्याच थोरामोठयांचा मोलाचा वाटा राहिला.
तसेच समाजकार्य आणि व्यवसायातून नकळतपणे आयुष्याला राजकारणाचे वळण मिळाले आणि त्यातून अनुभव तसेच अनेकांच्या मार्गदर्शनातून अखंड जनसेवेचे ध्येय गाठणे साध्य झाले. माणसाची ओळख निर्माण करण्यात परिस्थिती आणि संधी या दोन्ही गोष्टी महत्वाची भूमिका बजावतात असेच मी म्हणेन अस देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लवकरच हे पुस्तक बाजारात उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात सुभाष देशमुख यांचा जीवनप्रवास रेखाटलेला आहे. तसेच त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनातील महत्वाचे प्रसंग या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
#पक्षांतर : शिवसेना प्रवेशावर भाजप आमदार म्हणतात…
शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही : तानाजी सावंत
बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझं ठरलंय अन हनीमुन पण झालाय – जयकुमार गोरे
#पक्षांतर : ‘ज्यांना जायचंय त्यांनी लवकर जावं, काँग्रेस शुद्ध होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

