Share

बापू मानलं तुम्हाला : कोरोनामुळे जनतेचा गुदमराला श्वास, सुभाष देशमुखांनी घेतला जनसेवेचा ध्यास

Published On: 

सोलापुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी जनसेवेचा ध्यास घेतला असून विविध माध्यमातून ते सतत जनतेच्या संपर्कात आहेत. जनतेच्या अडचणी समजून त्यावर तात्काळ उपाययोजना करताना दिसत आहेत.

जागतिक महामारी म्हणून ओळखल्या कोरोनाचा देशभरात शिरकाव झाल्यावर लागलीच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सोलापूरसह सर्वत्र संचारबंदी करण्यात आली. संचारबंदीच्या दुसर्‍या दिवसापासूनच आमदार सुभाष देशमुख जनसेवेत  सक्रिय झाले. निलम नगर परिसरात त्यांनी ताबडतोब गोरगरीब,  मजूर,  कष्टकऱ्यांसाठी अन्नदान सुरू केले. दोनच  दिवसात भाजपच्या बुथ  प्रमुखांना कामाला लावत सर्वांची यादी घेत त्यांना घरपोच अन्नदान सुरू केले. आज सुमारे  चार ते पाच हजार लोक लाभ घेत आहेत. त्यानंतर आमदार देशमुख यांनी लागलीच  दक्षिणमधील  अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय स्थानिक विकास निधीतून सुमारे एक कोटी रुपये कोरोना ग्रस्तांच्या औषधांसाठी,  डॉक्टरांच्या किट साठी दिले. याशिवाय फोन कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध सरपंचांशी संवाद साधत प्रत्येक गावातील आढावा घेतला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्या त्या गावातील अडचणी सोडविण्यास सांगितले. याशिवाय बेंगलोर,  हैदराबाद यासह विविध ठिकाणी अडकलेल्या सोलापूरकरांच्या जेवणाची आणि राहण्याचीही सोय संबंधितांना सांगून केली. कोरोना च्या काळात 24 तास सेवेत असलेल्या पोलिसांनाही सुरक्षितेसाठी लोकमंगल च्या माध्यमातून मास्क,  सॅंनीटायझर वाटप केले. याशिवाय आमदार सुभाष देशमुख दररोज शहरातील प्रतिष्ठित  नागरिकांना,  उद्योजकांना आणि पत्रकारांना फोन करून त्या त्या भागातील समस्या जाणून घेत आहेत आणि शक्‍य त्या समस्या सोडण्याचा ही त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे.

अडचणी असल्यास संपर्क साधावा

आज कोरोनामुळे देशावर संकट आलेले आहे. सोलापूरसह  सर्वत्र संचार बंदी आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपले कर्तव्य पार पडत आहे. यापुढे कोणालाही कसलीही गरज लागली तर त्यांनी लोकमंगलशी संपर्क साधावा,  त्यांच्या अडचणी निश्चितच दूर करण्यात येतील, आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!