टीम महाराष्ट्र देशा : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे महापोर्टल बंद करण्यात यावे, तसेच इतर मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन केले आहे. औरंगाबादच्या पैठणगेट येथून हा मोर्चा काढण्यात आला.
राज्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवरुन माहिती घ्यावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने विविध परीक्षांसाठी एकच ई महा परीक्षा पोर्टल सुरु केले. विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येतात.
दरम्यान, राज्य सरकारचे महापोर्टल बंद करण्यात यावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली. इतकेच नव्हे तर राज्य सरकारचे महापोर्टल बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज औरंगाबादच्या पैठणगेट येथून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पैठणगेट येथून विभागीय आयुक्तालया पर्यंत काढण्यात आला.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ?
महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी.
एसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी.
पीएससीच्या वेळापत्रकासोबत जागांची आकडेवारी जाहीर करावी.
उत्पादन शुल्क एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात.
पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.


