🕒 1 min read
मुंबई : सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. पण आता या कोरोनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सोडलेले नाही. नुकतेच मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी उच्चायुक्त शिरीश दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिरीश दीक्षित हे मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आत्तापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
1871 Mumbai police personnel have been infected with #COVID19 so far, including 853 recovered & 21 deaths. 82 positive cases also reported among State Reserve Police Force (SRPF) personnel deployed in the city: Mumbai Police #Maharashtra pic.twitter.com/WMhaVPkzIA
— ANI (@ANI) June 9, 2020
ही शिवसेना बाळासाहेबांचीच, पण शब्द न पळणारी भाजपा वाजपेयींची राहिली आहे का ?
मुंबई पोलिस विचारतायत ‘हाउज द डिस्टन्स’? ‘उरी’स्टाइलचे टि्वट करत जनजागृती
भाजपनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्ब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलमध्ये केलं अॅडमिट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
