Share

प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतलेल्या विद्यार्थिनीनेच शपथ मोडली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती.‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावरच प्रेमविवाह न करण्याची शपथ या मुलीना महाविद्यालयातील प्रचार्यांनीच दिली होती. त्यानंतर बरच गदारोळ झाल्यानंतर शपथ देणाऱ्या शिक्षकांना निलंबितही करण्यात आलं होतं.

आता एकीकडे शिक्षकांचं निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी कॉलेजसमोर आंदोलनाला बसलेल्या आहेत. तर दुसरीकडे शपथ घेणाऱ्या या विद्यार्थिनीपैकीच एक विद्यार्थिनी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकरासोबत पळालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.

प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तासिकांवर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलं आहे. आम्ही शपथ स्वत:हून घेतली होती, शिक्षकांनी आमच्यावर शपथ लादली देखील नव्हती, असा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.

दरम्यान, ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशीच अमरावतीच्या चांदूर येथील महाविद्यालयात विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली होती. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला होता. विशेष म्हणजे महाविद्यालाय्तील शिक्षकांनीच ही शपथ फक्त विद्यार्थिनीनाच दिली होती.

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!