बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यानंतर कोरोनाची स्थिती ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आटोक्यात आल्यानंतर स्तरांमध्ये विभागणी करून टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंधांना शिथिलता सुरुवात करण्यात आली. यानंतर, नागरिकांची बेफिकिरी लक्षात घेता निर्बंध वाढवून संपूर्ण राज्यात तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले.
आता बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक होत असून प्रशासनाने वेळीच स्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध अधिक कडक केले आहेत. आष्टी, पाटोला आणि गेवराई या तीन तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा घटत नसल्याने सर्व दुकाने फक्त ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे दुपारी १ नंतर नागरिकांनी फक्त अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणामुळे घराबाहेर पडल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.
आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यातील आकडे चिंताजनक आहेत. प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील चित्र बदलत नसल्याने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर कोल्हापूर जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश; सर्व प्रकारचे दुकाने होणार सुरु
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता ? चंद्रकांत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर
- ‘भाजप ही वॉशिंग मशीन इथे डाकू पण साधू होतात’ ; राष्ट्रवादीचा टोला
- पुणेकरांना किंचित दिलासा : कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, तर नव्या कोरोना बाधितांची संख्या…


