मुंबई : कोरोना व्हायरस संदर्भात देशात तसेच राज्यात अनेक अफवा पसरवण्याचे काम होत आहे. या अफवांकडे जनतेने लक्ष देऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानसभेत केले. राज्यात तसेच देशात या कोरोना बाधित रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे चिंतेची गोष्ट नाही. या आजाराबाबत राज्यात अफवा पसरवणाऱ्या समाज कंटकांचा सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून शोध घेऊन कडक कारवाईची व्यवस्था करू, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या आजारावर औषध अद्याप तयार झालेले नाही. मात्र त्यावर प्राथमिक उपचार होणे जरुरीचे आहे. या आजाराची काळजी घेण्यासाठी विमानतळावर पॅसेंजर स्क्रिनिंग चेकअप करण्यात येत आहे. अद्याप ६१,९३९ विदेशी प्रवाशांची तपासणी झाली आहे. या आजाराची लागण झालेल्या देशातून येणारी विमाने ज्या विमानतळावर येतात त्याठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात येईल, तसेच विमानतळांप्रमाणे बंदरांवर देखील या तपासणीची व्यवस्था राज्य सरकार करणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
यासाठी पुणे येथे कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. त्याचा हेल्पलाईन नंबर १०४ असा असून आजाराबाबतची खात्रीलायक माहिती जनतेला या केंद्रातून देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

