🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी या लढ्यात योग्य तो निर्णय घेत आहेत. सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करत आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. नियमांचे पालन करुन आपण कोरोनाविरोधातील लढा निश्चित जिंकू, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्री यांनी ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत कोरोना विषाणूच्या लढाईत झोकून देण्याची परिस्थिती जगावर ओढावल्याचे म्हटले आहे. ‘कोरोना विषाणूविरोधातील सामना विश्व चषकातील एखाद्या सामन्यापेक्षाही महत्त्वपूर्ण असून हा लढा आपणच जिंकू, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणतात, ‘कोविड-१९ विरोधातील लढ्यात विश्वचषकाप्रमाणे ११ खेळाडू मैदानात नाही तर जगातील १ अब्ज ४० कोटी लोक मैदानात आहेत. कोरोना विरोधातील सामना म्हणजे मानवतेचा विश्वचषक आहे’, असं शास्त्री यावेळी बोलताना म्हणाले.
Stay Home, Stay Safe! ????#Lockdown2 #COVID19 #StayHome #IndiaFightsCorona pic.twitter.com/JQTZVib2in
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 15, 2020
दरम्यान, शास्त्रींनी लॉकडाउनरच्या कालावधीत घरी राहून आपल्याला कोरोना विरोधातील लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान द्यायचे आहे, असे आवाहन केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
