पुणे : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अगदी संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी अत्यावशक सेवा देत आहेत. देशभरात लॉकडाउन असताना फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र या कठीण परिस्थितीत देखील काही ठिकाणी काळाबाजर सुरु असल्याचे चित्र आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या सोबतच काही भागात अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची कुजबुज सुरु आहे. यासंदर्भात आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे.सध्या ब्लॅकने होणारी दारूविक्री थांबवावी, तसेच ग्रामीण भागात ज्या गरीब मजूरांकडे पैसे नाहीत, त्यांना धान्याच्या बदल्यात दारू विकली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
देशभरात लॉकडाउन असताना फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. परंतु काहीजण चोरून दारू विकण्याचे प्रकार समोर येत आहेत ,यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राजुरा येथे काल कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. अनेक जिल्ह्यातून आम्हाला या संदर्भात अनेक फोन येत आहेत,त्यामुळे अश्या दारू विक्रेत्यांवर तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आणि उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

