Share

मुलं जन्माला घालणं बंद केलं पाहिजे!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : हो,तुम्ही ऐकले ते खरे आहे.हे म्हटलं आहे प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी. मनोविकास प्रकाशन संस्था आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित ‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय ना…’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कुलकर्णी म्हणाले की ‘लग्न केलं म्हणजे आता मूल झालंच पाहिजे. हे बदलायला हवे. मूल जन्माला घालणं बंद करायला हवे, गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. मूल जन्माला आले की, वस्तूंचा वापर सुरू होतो. आता वाढलेली लोकसंख्या आपण लगेचच्या-लगेच  कमी करू शकत नाही. पण पर्यावरणाला वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियम बदलले पाहिजेत, अशी उदविग्नता त्यांनी व्यक्त केली.

लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कुलकर्णी पुढे म्हणाले ‘जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला आपण खाईत लोटले आहे. मागे वळून बघताना आपले काय चुकले, हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या जशाच्या तशा येणाºया पिढीवर लादणार आहोत का ? आता वेळ आलीय हे आमचं चुकलं हे कबुल करण्याची, गाडी बंगला हे महत्त्वाचे वाटत आहे. स्पर्धेला महत्त्व दिले जात आहे. आजकाल तर खूप स्पर्धा आहे, असा पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो. हेच आपण मुलांना शिकवतोय. आजकाल आपण आपल्यातच खूप बिझी झालोय.

पर्यावरणाचे बदल होत असताना, त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलणे आवश्यक आहेतमाझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही, त्यासाठी हे एक कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी लेखक अतुल देऊळगावकर, चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, अरविंद पाटकर, आशिष पाटकर उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!