Share

‘मंत्री संजय बनसोडेंनी फुकटचे श्रेय घेणे थांबवावे’, सुधाकर भालेराव यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

लातूर : उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे श्रेय लाटणे बंद करावे. मी आमदार असताना उदगीर मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या-ज्या योजना मंजूर केल्या, त्याच योजना नवीन कार्यारंभ आदेश काढून त्याचे नारळ फोडून उद्घाटन करण्याचे सत्र राज्यमंत्री संजय बनसोडे हे चालवत आहेत. मी केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी कोठेही पुढाकार घेतला नाही. ना त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, मतदारांची दिशाभूल करून ही विकासकामे मी मंजूर करून आणली, अशा शब्दात माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पालकमंत्र्यांना आवाहन केले.

शुक्रवारी भालेराव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अटल अमृत योजनेअंतर्गत लिंबोटी उदगीरला पाणीपुरवठा योजनेचे काम माझ्या काळात मंजुर झाले असून ते आता पूर्णत्वास आले आहे. उदगीरचा एमआयडीसीचा प्रश्न मी लावून धरला. त्या प्रश्नाविषयी माझे विधानसभेत निवेदन केले आहे. त्याचा प्रस्ताव मी सादर केला व त्याची मंजुरी मी मिळवली आहे. उदगीर शहराला जोडणारे नांदेड जळकोट बिदर व आष्टामोड ते देगलूर हे राष्ट्रीय महामार्ग माझ्या प्रयत्नामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले.

दरम्यान माजी आ. भालेराव यांनी पालकमंत्र्याला केलेल्या आवाहनानंतर उदगीरचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. कामाचे श्रेय लाटण्याचा हा मुद्दा खूप दिवसांपासून घोंगावत होता. शेवटी या मुद्दयाला पेव फुटला आहे. येणाऱ्या काळात या मुद्द्यावरून उदगीरकरांना टोकाचा संघर्ष अनुभवायला मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!