मुंबई : राज्यातला कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सर्वात जास्त रुग्ण सापडले. एकाच दिवसांमध्ये 1008 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या आता 11 हजार 506वर गेली आहे. तर मुंबई कोरोनाचा हॉट स्पॉट बनली आहे. काल मुंबईत 751 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता मुंबईतील नवी रुग्णसंख्या 7625 वर गेली आहे. तर आजच्या 5 मृत्यूंसह एकूण संख्या 295 वर गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘सुरुवातीलाच राज्य सरकारने लक्ष द्यायला हवं होतं, पण दुर्दैवाने ते दिलं गेलं नाह,’ असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेकडील कोरोना संदर्भातील सगळ्या यंत्रणा स्वतः कडे घ्याव्यात. मुंबईतील लोकसंख्या नियंत्रणात येणे गरजेचं आहे. यासाठी परराज्यतील लोकांना त्यांच्या राज्यत जायला परवानगी दयावी. तसेच झोपडपट्टीतील लोकांना त्यांच्या मूळ गावी जाऊ द्या.’
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र पाठवून मागणी केली, यात 24 महत्वाचे मुद्दे पत्रात नमूद केले आहेत, अशी माहिती यावेळी बोलताना मेटे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

