Share

भावकीतले भांडणं मिटवा ; ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान; तर ३० मार्च २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. तरी संबंधित ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे अर्थात अर्ज ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत स्वीकारले जातील.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दाखल अर्जांची छाननी १६ मार्च २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १८ मार्च २०२० पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २९ मार्च २०२० रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होईल. अशी माहिती आयोगाने दिली आहे.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- १३ , रायगड- १ , रत्नागिरी- ८ , नाशिक- १०२ , जळगाव- २ , अहमनगर- २ , नंदुरबार- ३८ , पुणे- ६ , सातारा- २ , कोल्हापूर- ४ , औरंगाबाद- ७ , नांदेड- १०० , अमरावती- ५२६ , अकोला- १ , यवतमाळ- ४६१ , बुलडाणा- १ , नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली- २९६ .

एकूण– १५७०

राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान, तर ३० मार्च २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान थेट सरपंच निवडपद्दतरद्द करून पुन्हा सदस्यांच्या मार्फत सरपंच निवडीचा कायदा अद्याप विधिमंडळात संमत न झाल्याने सरपंचाची निवड थेट होणार आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!