Share

मुंबई विद्यापीठाचे ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र

Published On: 

🕒 1 min read

वेबटीम : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभाराचा बऱ्याच विद्यार्थांना फटका बसला. प्रदीर्घ काळानंतर जाहीर झालेल्या निकालामध्ये असंख्य त्रुटींचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील मदतकेंद्र अपुरे पडत असल्याने आता ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात  आले आहे.

निकालातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने सुरु केलेल्या ऑनलाइन केंद्रामुळे विद्यार्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन केंद्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १० अधिकाऱ्यांचा चमू कार्यरत असणार आहे. आलेल्या तक्रारींचा तात्काळ मागोवा घेऊन त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आणि ईमेलवर प्रत्युत्तर दिले जाणार आहे. निकालाबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास विद्यार्थी https://www.asia-sp.in/MU/results.php या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत विद्यापीठाने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली होती. परंतु ४७७ परीक्षांच्या निकालांपैकी अद्याप १७ निकाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही मुदत ८ सप्टेंबर वाढविण्यात आली आहे

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!