Share

असे करा कमीत-कमी खर्चात ‘शेळीपालन’; अन् व्हा मालामाल

Published On: 

मुंबई : शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.

शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत.

आपल्या देशातील आढळणाऱ्या शेळ्याच्या जातींमध्ये रोगांपासून वाचण्यासाठी आणि कोणत्याही वातावरणात राहण्याची क्षमता अधिक आहे. प्रजनन क्षमतही या जातींमध्ये अधिक आहे. प्रत्येक वर्षी शेळ्यांच्या संख्येत ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होत असते. प्रत्येक वर्षी शेळ्यांपासून मिळणाऱ्या दूधापासून किमान ५०० रुपये मिळतात.

शेतकऱ्यांना शेळी पालनाचा फायदा व्हावा, यासाठी शासनाकडून योजनाही राबवली जात आहे. जेणेकरुन ग्रामिण युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल. शेळी पालनासाठी बँकेकडून ५० हजार ते ५० लाख रुपयांचे कर्जही मिळते. राज्य सरकारकडून या योजनेसाठी अनुदानही मिळते.
दरम्यान, महाराष्ट्रात उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण, कन्यला आणि सुरती या शेळ्यांच्या जाती आहेत. याशिवाय लेंडी खत शेळींपासून मिळत असते. शेळींची गर्भधारणा ही ६ ते ७ महिन्याची असते. वर्षभरात आपल्या शेळींची संख्या दुप्पट होत असते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!