Share

जोशुआची अक्कल आली ठीकाण्यावर, मनसेच्या ‘खळ खट्याक’ नंतर मागितली माफी

Published On: 

मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यानंतर संपूर्ण राज्यात एक संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुसरीकडे मनसेने आपल्या चीर-परिचित ‘खळ खट्याक’ अंदाजात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करणारा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी पोहचून पूर्ण थेटर फोडले आहे. मनसे कार्यकर्ते यश रानडे आणि कार्यकर्त्यांनी हा कारनामा केला आहे.

मनसेच्या या ‘खळ खट्याक’ नंतर अग्रिमा जोशुआची अक्कल ठीकाण्यावर आली आहे. अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ट्वीट करून तिने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच अग्रिमाने तिच्या कॉमेडीचा वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा डिलीट केला आहे.

https://twitter.com/Agrimonious/status/1281617819671474176?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!