Share

अखेर एसटी महामंडळाने ‘ते’ पाऊल उचललेच!

Published On: 

मुंबई: गेल्या अनेक आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली होती, मात्र तरी देखील अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. मात्र या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे राज्यसरकारने कामावर हजर राहण्यास सोमवारची मुदत दिली होती.

सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकाच्या विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे.

या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडे सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर तीन सुनावणी होतात त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते. आता कर्मचारी पुन्हा कामावर तातडीने रुजू होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!