Share

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार ‘एवढा’ बोजा

Published On: 

मुंबई: राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते.

बैठकांचे सत्र हे चार वाजता संपलं. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिब परब हे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले. बैठकी दरम्यान कर्माचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव हा राज्य शासनातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावापेक्षा एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीगीकरण करावे ही भुमिका एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. तर राज्य शासनाच्या प्रस्तावावर थेट प्रतिक्रिया देण्याचे आमदार पडळकर यांनी टाळले आहे. सरकारने अधिकृत भुमिका जाहीर केल्यावर प्रतिक्रिया देऊ असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले आहेत. आता अनिल परब हे सह्याद्री अतिथी गृहाकडे निघाले आहेत. तिथे ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंतही आहेत. शिष्टमंडळासोबत त्यांची आत्ता बैठक सुरु आहे. त्यानंतर अनिल परब आणि शिष्टमंडळाची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र या पगारवाढीमुळे वर्षाला ६०० ते ६५० कोटींचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!