औरंगाबाद: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतरही औरंगाबाद विभागातील एसटी कर्मचारी रुजू झालेले नाही. एसटीच्या त्रिसदस्यीय समितीकडून २२ जानेवारीनंतर येणाऱ्या अहवालाकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. समितीकडून आलेल्या अहवालानंतर उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कर्मचारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेणार आहेत.
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात संपातून माघार घेऊन ९०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र इतर कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असून न्यायालयाच्या सुनावणी नंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचे औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील आगारात प्रातिनिधिक स्वरूपात मोजकेच कर्मचारी दुखवटा पाळण्यासाठी बसलेले आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता इतर कर्मचार्यांनी घरूनच सहभागी होण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांतर्फे घेण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाभरात एसटीच्या १५० बसेसच्या माध्यमातून ३५० फेऱ्या करण्यात आल्या. यातून ५३७९ प्रवाशांनी प्रवास केला.
महत्वाच्या बातम्या:
- वादग्रस्त व्यक्तींसोबत नात, सलमानसोबत जवळीक; जॅकलिनच्या अफेअरची मोठी यादी
- फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा? रुपाली ठोंबरेंचा टोला
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

