Share

स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : स्पृहा जोशीची ओळख संवेदनशील अभिनेत्रीसोबतच संवेदनशील कवयित्री अशीही आहे. स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. १ मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

स्पृहा जोशी म्हणते, “मी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर गावात मी श्रमदानासाठी गेले होते. आणि माझ्या श्रमदानातल्या त्या चांगल्या अनुभवानंतर माझ्या आई आणि काकू दोघींनीही यंदा माझ्यासोबत श्रमदानात सहभागी व्हायचं ठरवलं. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या पाणी फाउंडेशनच्या मोहिमेत मला सहभागी होता येतंय, याचं मला समाधान वाटतंय. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचा आनंद आगळाच आहे.”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!