मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी देश युध्द पातळीवर लढत आहे. या लढाईत देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने मदत करताना दिसत आहेत. तसेच देशात सर्वच स्तरावरून आर्थिक मदत करायला लोकं पुढे सरसावले आहे. बॉलीवूड कलाकार, मोठमोठे उद्योजक, खेळाडू, राजकीय नेते या क्षेत्रातील प्रत्येकाने आपापल्या परीने कोरोनाग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या PM CARES मार्फत मदतीचा हात पुढे केला.
यामध्ये आता १५ वर्षांच्या इशा सिंह या मुलीनेही PM CARES मार्फत कोरोनाग्रस्तांसाठी मदत केली आहे. शुटर असलेल्या इशा सिंहने आपल्या आतापर्यंतच्या सेव्हिंगमधून ३० हजार रुपयांची मदत दिली आहे. ३०हजार ही रक्कम आतापर्यंत आलेल्या मदतीमध्ये कमी असेल. पण १५ वर्षांच्या इशाचं मन मोठं असल्याचं दिसून येतं. इशाने या मदतीसंदर्भात सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.
दरम्यान, तू अवघ्या १५ वर्षांची असूनही खरी चॅम्पियन आहेस. असं म्हणत केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी रिट्विट करून इशाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केयर्स फंडाला मदत करा, असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. रहाणेने केलेली ही मदत कोरोनाशी लढताना गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वापरली जाणार आहे. अजिंक्य रहाणेनेही आपण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्याला दुजोरा दिला आहे.
हेही पहा –


