Share

“इस्राएलचे मानवरहित अंतराळयान चंद्रावर कोसळले”

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : इस्राएलचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले आहे. ‘बेरशीट’ (Beresheet) असे या मोहिमेचे नाव होते. खासगी निधीतून चंद्रावर पाठवलेले हे पहिलेच यान होते.ही मोहीम २२ फेब्रुवारीला सुरू झाली. फ्लोरिडातील केप कॅव्हेरल येथून यानाचे प्रक्षेपण झाले होते आणि यान ४ एप्रिलला चंद्राच्या कक्षेत पोहोचले. चंद्रापर्यंतच सरासरी अंतर ३ लाख ८ हजार किलोमीटर आहे.

या यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास ७ आठवड्यांपूर्वी सुरू झाला होता. मानवरहित हे यान चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहोचले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असतानाच यानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. छायाचित्र घेणे आणि काही प्रयोग करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते.

या मोहिमेसाठी १०० डॉलर इतका खर्च आला होता. भविष्यातील कमी खर्चाच्या चंद्रमोहिमांची रूपरेषा या मोहिमेने आखून दिली आहे. खासगीरीत्या चालणारी SpaceIL आणि इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे ही मोहीम आखली होती.

या अपयशामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची इस्राएलची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!