Share

इंग्रजी शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, मेस्टाचे शिक्षण मंत्र्यांना साकडे!

Published On: 

औरंगाबाद : नवीन शाळांना त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटीवर परवानगी द्यावी, इंग्रजी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यासंदर्भात मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

राज्यातील इंग्रजी शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबद्दल मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले. याप्रसंगी इंग्रजी शाळा संदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात विकत घेतलेल्या किंवा भाडेपट्ट्यावर शासकीय जमिनीवर सुरु असलेल्या कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांना २५ टक्क्यांचा थकीत आरटीई फी परतावा त्वरित वितरित करण्यात यावा हि मागणी त्यांनी केली आहे.

शासकीय स्तरावर प्रलंबित दर्जावाढ प्रकरणे निकाली काढणे, शुल्क नियंत्रण समिती रद्द करणे, पालकांना फी भरण्यासंदर्भात परिपत्रक जारी करावे, आरटीई प्रतिपूर्ती रक्कम कमी करून प्रती विद्यार्थी ८ हजार रुपये फी परताव्याचे परिपत्रक रद्द करणे या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरच मेस्टा संघटनेसोबत बैठक बोलावून सर्व समावेशक चर्चा घडवून आणण्यासंदर्भात विभागाला कळवले, असल्याचे संजय तायडे पाटील, मनिष हांडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!