Share

दिलदार सोनू सूद आता मुंबई पोलिसांच्या मदतीला धावला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- अभिनेता सोनू सूदने पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवत महाराष्ट्र पोलिसांसाठी भरघोस मदत केली आहे. सोनू सूदने काल गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड भेट दिल्या आहेत.

गृहमंत्री देशमुख यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याची ही मोलाची मदत पाहून ट्विटरच्या माध्यमातून त्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले आहेत.

अनिल देशमुख यांची सोनू सूदने भेट घेतली आणि पोलिस कर्मचा-यांसाठी 25,000 फेस शिल्ड दिले. मी सोनू सूद याचा या अतुलनीय योगदानाबद्दल आभारी आहे असे आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, सोनू सूद च्या या कामाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली होती. पण ‘अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केले? असा थेट सवाल करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला होता.

दरम्यान, सोनू सूद कोरोनव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी गरजू लोकांना मदत करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. लॉकडाऊन दरम्यान परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मदत केल्याच्या अनुभव सांगणारे पुस्तक देखील तो लिहिणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!