Share

चिथावणीखोर भाषाणाविरोधात सोनिया गांधी, प्रियांका गांधी असदुद्दीन ओवैसी विरोधात गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियांका गांधी आणि एआयएमआयएम चे प्रमुख प्रमुख असदुद्दीन ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगड मुख्य न्यायदंडाधिकारी(CJM)न्यायालयात वकील प्रदीप गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मेरठमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, शहरात सध्या जमावबंदी लागू केल्याच कारण देत अधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांना परत जाण्यास सांगितलं. त्यामुळे या त्यांना पुन्हा दिल्लीला परतावं लागलं.

त्याचप्रमाणे चेन्नईत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रॅली काढल्याबाबत डीएमके पक्षप्रमुख एम के स्टाली यांच्यासह आठ हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय हा मोर्चा काढल्याचा आरोपाखील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!