Share

पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल; काही लोकांचं लक्ष सरकार अस्थिर कसं होईल याकडेच होतं, मात्र…

Published On: 

मुंबई : निवडणूक आयोगाकडून आज मोठी घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता.

यावर आता निवडणूक आयोगानेही हालचाल केली आहे. तर आता 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘आम्ही नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली होती, लवकर निर्णय होणे अपेक्षित होतं, मात्र झाला नाही, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला विनंती करुन 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली, ती मान्य झाली, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शंभर टक्के निवडून येतील,’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘देश कोरोनाविरोधात लढत असताना, काही लोकांचं लक्ष सरकार अस्थिर कसं होईल याकडेच होतं. त्यासाठी त्यांनी बराच वेळ घालवला, मात्र आता झालं गेलं विसरुन ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहू,’ असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना लक्ष केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!