Share

भक्त निवासात चक्क जुगाराचा खेळ ! तुळजापुरातील घटना

Published On: 

तुळजापूर : शहरातील दिपक चौकातील आसरा भक्त निवासात चालु असलेल्या जुगार अड्यावर   तिरट नावाचा जुगार खेळणा-या आठ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडून 11350 रुपये रोख रकमेसह 120350 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सदरील कारवाई सोमवार दि.20रोजी पाच वाजता करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने केली.

या बाबतीत अधिक माहीतीअशीकी शहरातील दिपक चौकातील आसरा भक्त निवासतील खोली नंबर सहा मध्ये जुगार चालु असल्याची माहिती मिळताच पोलिस तिथे जाऊन थडकले असता पैशावर तिरट नावाचा जुगार खेळत असताना भारत सोनवणे, आकाश अमृतराव, नितीन रोचकरी, गणेश सिरसट, गजानन जगताप, शुभम माने, योगेश रोचकरी, संतोष पवार,हे सर्व लोकं तुळजापूर इथले असून ते त्या ठिकाणी पोलिसांना सापडले.

या प्रकरणी सपोनी सुरेशचंद्र रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ जणांन विरोधात कलम 4,5मुंबई जुगार कायदा सह कलम 188,269अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शन खाली पो.काँ. राठोड, राऊत, चाफेकर, कोलारे, मांडोळे, अतकरे यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!