Share

सोमय्या म्हणाले कारखान्यांचे मालक कोण? अजितदादांनी कुंडलीच मांडली

Published On: 

पुणे : जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? असा सवाल करत कारखान्याच्या मालकाचे नाव जाहीर करण्याचे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना केले होते. त्यावर अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन या कारखान्याची संपूर्ण कुंडलीच माध्यमांसमोर मांडत सोमय्यांना तोंडघशी पाडले आहे. आता यावर किरीट सोमय्या काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांसह त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेवर, कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यावर किरीट सोमय्या यांनीही अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ६५ साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत . तसेच ६४ सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतल्याची आकडेवारी त्यांनी माध्यमांसमोर मांडली.

अजित पवार म्हणले, हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर मिल काढली. त्यांचे कुटुंब त्यात होते. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहे. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच ३ ते ५ कोटी रुपयांपर्यंत विकल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखानदारी बद्दल खूप काही बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला १२ ते १५ वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो. पण आता अतिरेक झाला आहे, म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात २५ हजार कोटी, काहींनी १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यामुळे नवीन सरकार आलं, त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!