Share

सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६५ वर ; आज ४ नवीन रुग्ण

Published On: 

सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तीची संख्या ६५  झाली असून आज नव्याने ४ रुग्ण सापडले आहेत. हे चार कोरोना बाधित रुग्ण सोलापूर परिसरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

यामध्ये दोन रुग्ण शास्त्रीनगर परिसरातील,  एक रुग्ण सिव्हील हॉस्पिटल परिसरातील आणि एक रुग्ण न्यू तिर्हे गाव (फॉरेस्ट चांदणी चौक) येथील असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे एक्काहत्तर व्यक्ती या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये सातशे चाळीए जण असून आयसोलेशन वॉर्डातील बाराशे एंशी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक हजार पंच्याहत्तर जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून दोनशे पाच जणांची रिपोर्ट प्रलंबित आहेत.

प्राप्त झालेल्या एक हजार पंच्याहत्तर रिपोर्ट मधील एक हजार दहा जण हे कोरोना निगेटिव्ह आहेत तर पासष्ठ जन हे पॉझिटिव्ह आहेत. सोलापुरातील पाच व्यक्तींचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित साठ जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे तेवीस रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी एकोणीस रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर चार रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!