Share

मामा आता विधानसभा लढवा, करमाळ्यातील समर्थक मांडणार शिंदेंच्या घरासमोर ठिय्या

Published On: 

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जि प अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या करमाळ्यातील समर्थकांची द्विधावस्था झाली आहे, गेली साडेचार वर्षे विधानसभेची तयारी करूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द पाळत शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे आता निवडणुकीत पराभव झाला असला तरी संजय शिंदे यांनी करमाळ्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली जात आहे.

संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करावे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. संजय शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात करमाळा तालुक्यातील राजकारणामध्ये तीव्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या रश्मी बागल या करमाळ्यातून विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या दावेदार आहेत. असे असले तरीही संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी, या मागणीसाठी शिंदे यांच्या समर्थकांची गुरुवारी करमाळा शहरामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले नाही तर, त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!