Share

अखेर नांदेडचे ‘ते’ ३८ मजूर पुण्याहून रवाना

Published On: 

पुणे : लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

या मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोविड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

..तर तुमचा कणखरपणा दिसला असता, राजू शेट्टींनी केलं मुख्यमंत्र्यांना लक्ष

त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉक डाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली, तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

विशाखापट्टणम येथील वायुगळती नंतर PM मोदींनी बोलावली एनडीएमएची बैठक

या ३८ प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले.

मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा केला जीवघेणा प्रवास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!