🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ हजार पार गेला आहे. सुरुवातीला मुंबई, पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या २ दिवसांपासून कन्टेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.
सद्या या भागात सकाळी १० ते दुपारी २.०० याच वेळेत दूध, भाजीपाला, किराणा, इत्यादी खरेदी साठी वेळ घोषित करण्यात आले आहेत. आज चिंचवड, पिंपळे सौदागरसह सांगवी भागात मोठ्या प्रमाणात लोक या वेळेत बाहेर पडल्याने गर्दी निर्माण झाली होती, तसेच सांगवीमधील दूध वितरकानी संप केल्यामुळे दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे अनेकांची अडचण झाली. यामुळेच आज सकाळीपासून अनेकांनी दूध दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. नागरिकांमध्ये देखील नाराजी असून पर्यायी व्यवस्था निर्माण करून यावर तोडगा काढला जावा अशी मागणी होत आहे.
तसेच चिकन, मटण च्या दुकानांना रविवार, बुधवार आणि शुक्रवारी चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात काही नागरिक हे फक्त हाल-हवाला घेण्यासाठी फिरत असल्याचे दिसून आले असून प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी होती.


