मुंबई : कोरोनामुळे राज्यात गेली दीड महिना सगळी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये सरकारचा खूप सारा महसूल बुडत होता. याचमुळे अर्थव्यव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर दारूची दुकाने सुरू करून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रूळावर आणण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत.
मात्र सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काम बंद, कमाई बंद, पण दारु सुरु हे करण्यामागचे रहस्य काय? असा सवाल सरकारला बंग यांनी विचारला आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनामुळे शासनाने महिनाभरापासून दारु, खर्रा आणि तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती, तर लोकांचा आणखी फायदा झाला असता,’
दरम्यान, ‘दारुची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारुच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील,’ असं मत बंग यांनी व्यक्त केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
