सांगली : सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना पाटील यांनी आपल्या काही आठवणीही सांगितल्या. तसेच यावेळी पोलिसांना ३-४ दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या, अश्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.
यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, ‘अजित पवार यांनी सांगितलं की जयंत पाटलांना गृह खात्याविषयी विचारलं तर त्यांचा बीपी वाढला. खरंच तसेच झाले होते. मी गृहमंत्री व्हायच्या आधी मी आणि अनिल बाबर एका लग्नात गेलो. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील देखील या लग्नाला होते. २००९ ला आर. आर. आबांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. तेव्हा मला पक्षाने सांगितले होते की तुम्हाला हे खातं घ्यायचे आहे. मी आबांना विचारले की हे कसे खाते आहे? तेव्हा आबांनी विचारले, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? मी म्हटलं अजिबात नाही. डायबेटिस आहे का? अजिबात नाही. मग आर. आर. पाटील म्हणाले, गृहखातं घ्या, या दोन्ही गोष्टी होतील.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘त्या काळात मला ब्लड प्रेशर झाला. माझ्या खासगी सचिवांना दोन्ही आजार झाले. इतके तणावाचे काम असते. त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे की ब्लड प्रेशर झालाय आता डायबेटिस मागे लागून घ्यायचा नाही. मंत्र्यांना इतका तणाव असेल तर पोलीस किती तणावात असतील याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांच्या सदृढतेकडे लक्ष देणं, त्यांना थोडा तरी दिलासा दिला पाहिजे. तो तणाव दूर करण्यासाठी उपक्रम राबवा. त्यांना ३-४ दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या’, अशा सूचनाही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

